Post Header
आम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार प्राप्त झालेली विनंती म्हणजे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) वर इतर वापरकर्त्यांना आपल्याशी संपर्क करण्यापासून रोखण्याची, किंवा आपण निर्दिष्ट केलेल्या ठराविक वापरकर्त्यांचे मजकूर लपवण्याची क्षमता. आम्ही गेला काही काळ हे करण्याचे नियोजन करत आहोत, व गेले काही महिने आम्ही सक्रियपणे हे विकसित करण्यामध्ये कार्यरत आहोत. याच कारणास्तव, आम्हाला आपल्याला हे कसे कार्यरत होणार आहे या संदर्भात अद्यतनीत करावयाचे आहे:
अडथळा वि. नि:शब्द करणे
आम्ही समिती-संवाद व नियम आणि तक्रार निवारण समित्यांसोबत, जे आमच्या वापरकर्त्यांशी थेट संपर्कात आहेत व आम्हाला येणारे सर्व अभिप्राय, वैशिष्ट्य-विनंत्या व सूचना खोदून काढण्यास आम्हाला मदत करू शकतात, त्यांच्या बरोबर जवळून काम करीत आहोत. यामुळे आम्हाला सर्वाधिक वापरकर्त्यांच्या इच्छा कशा पूर्ण कराव्या हे ठरविण्यास मदत होते ज्यामुळे त्यांचा AO3 वापराचा अनुभव, नवीन समस्या निर्माण न करता, अधिक सुरक्षित व आनंददायक होईल.
थोड्या चर्चांनंतर, आम्ही या नवीन कार्यक्षमता दोन भिन्न वैशिष्ट्ये म्हणून विचारात घेण्याचे ठरविले आहे:
- अडथळा करणे: विशिष्ट वापरकर्त्यांना आपल्याशी संपर्क करण्यापासून रोखणे
- नि:शब्द करणे: विशिष्ट वापरकर्त्यांचा मजकूर आपल्या वैयक्तिक संग्राह्य अनुभवामधून वगळणे
अशा प्रकारे, आम्ही आमच्या वापरकर्त्यांना पर्यायांचा एक संच देत आहोत त्यामुळे लोकांना AO3 वरील मजकूर निर्माण करणे व संपर्कात येणे अवघड न करता, त्यांचे अनुभव अधिक वैशिष्ट्यपूर्ण होतील आणि छळवणुकीपासून संरक्षणाचा एक पदर घातला जाईल. उदाहरणार्थ, एखाद्या वापरकर्त्याला आपल्या नावडत्या जोडीबद्दलचे खूप रसिककार्य पोस्ट केल्याबद्दल निःशब्द करायचे असेल, पण त्या वापरकर्त्याने आपल्या कार्यांवर टिप्पण्या करणे आपल्याला ठीक असू शकते. या दोन संकल्पना भिन्न केल्यामुळे, आम्ही सुद्धा पडद्यामागे इतर कार्यक्षमतांवर काम करत राहून, प्रारंभिक, व केंद्रित पर्यायांचे संच तैनात करण्यास सक्षम होऊ.
परंतु, हि वैशिष्ट्ये कशी काम करतील आणि अस्तित्वात असलेल्या कार्यक्षमतांबरोबर त्यांचा कसा संवाद असेल याचा तपशील असणारा अंतिम-योजना लेख लिहून काढण्याआधी अजून खूप काही विचारात घ्यावयाचे आहे. बदलाचा वाव असल्यामुळे, हि दोन्ही वैशिष्ट्ये त्यांच्या स्वतःच्या आव्हानांबरोबर व नुकसानांबरोबर आहेत जी आम्हाला पुढे जाण्याआधी संबोधायची आहेत.
या चर्चांमध्ये “जर शोधांच्या यादी मध्ये निःशब्द केलेला मजकूर असेल, तर वर दिसणारा आकडा बदलणे गरजेचे असेल का? फिल्टर मधे असणाऱ्या आकड्यावर त्याचा काय परिणाम होईल?” असे डझनभर छोटे तपशील तसेच ढोबळ विचार जसेकी, “जर एका आव्हानाचे अनेक नियंत्रक असतील, प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या अडथळा केलेल्या व निःशब्द केलेल्या खात्यांच्या यादी सोबत असेल तर काय?” हे संबोधणे गरजेचे आहे.
एकदा का आम्ही कोड लिहायला सुरुवात केली, तर आम्ही अशा तांत्रिक मुद्द्यांमधे अडकू शकतो जे नियोजनाच्या टप्पामध्ये उघड झाले नव्हते आणि ज्यामुळे आमच्या योजनेमध्ये मोठे बदल करणे आवश्यक होईल. म्हणून, आम्ही हि वैशिष्टये घोषित करण्यास तयार तेव्हाच असू जेव्हा आम्हाला खात्री असेल कि आम्ही ते घडवून आणण्याच्या खूप जवळ आहोत, जे हे कार्यरत होण्यास थांबलेल्यांसाठी निराशाजनक आहे याची आम्हाला कल्पना आहे.
पैसे वि. वेळ
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) कडे जरी कोडींग हाताळणाऱ्या संभाव्य कंत्रटदारासाठी पुरेसे पैसे असले (आपल्या सढळ देणग्यांच्या कृपेने!), तरी ते प्रभावीपणे करण्यासाठी, आम्हाला नक्की काय हवे आहे हे त्यांना किचकट तपशीलामध्ये सांगावे लागणार आहे, कारण आम्ही संकलन व आव्हानांसारख्या जटिल वैशिष्ट्यांशी अधिक परिचित आहोत व आम्हाला लोक कुठल्या पद्धतीने साईट वापरतात व त्यांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते याची जास्त चांगली कल्पना आहे.
बहुतकरून एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा हा सर्वात जटिल भाग असतो, आणि हे असे काही आहे जे आम्ही शेवटचा परिणाम म्हणून समस्या सोडवण्या ऐवजी वाढवण्याचा धोका न घेता सहजपणे आऊटसोर्स करू शकत नाही.
याव्यतिरिक्त, जे लोक या संवादामध्ये सहभागी होणे गरजेचे आहेत कारण त्यांच्याकडे AO3 च्या आंतर्गत कार्यकारिणी चे व वापरकर्त्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या अभिप्रायांचे ज्ञान आहे, ते तेच लोक आहेत जे दिवसाकाठी AO3 चालवण्यासाठी, छोट्या समस्या सोडवण्यासाठी, दृष्टीआडील प्रक्रिया अद्ययावत आहेत याची खात्री करण्यासाठी, आणि समिती-संवाद समिती आणि नियम व तक्रार निवारण समिती सहजरित्या चालवण्यासाठी गरजेचे आहेत.
हे सर्व स्वयंसेवक करतात, आणि साईट कार्यरत ठेवण्यासाठी कधीकधी इतर वचनबद्धतांकडे आधी लक्ष द्यावे लागते. याचा परिणाम म्हणून, प्रत्येक मोठा किंवा मध्यम आकाराचा प्रकल्प सुद्धा प्राथमिक कल्पनेपासून नवीन वैशिष्ट्ये बाहेर येईपर्यंत खूप वेळ-खाऊ होतो.
या दरम्यान...
जरी अंगभूत आणि वापरण्यास सोपे, अडथळा व निःशब्द करणारे टूल्स हे सध्या दूर असले, तरी आमचे अनधिकृत ब्राउजर टूल्स वाविप्र काही तृतीय पक्ष स्क्रिप्टस ज्या आपल्याला अवांछित मजकूर फिल्टर करू देतात सूचित करतात. आम्ही अजून काही महत्वपूर्ण बदलांवर काम करीत आहोत ज्याने आपल्याला आपल्या AO3 च्या अनुभवावर जास्त नियंत्रण मिळेल.
मागील वर्षात, आम्ही आपल्या कार्यांवर टिप्पण्या बंद करणे किंवा विशिष्ट टिप्पणी धागे थांबवणे हि क्षमता घातली आहे. आम्ही अशा बदलांवर सुद्धा कार्यरत आहोत जे आपल्याला भेट प्राप्त करण्याच्या निवडीपासून किंवा संकलन आमंत्रणापासून मागे हटण्याची क्षमता देतील, त्याच प्रमाणे आपण आपल्याला सह-निर्माता सूचित करण्याच्या इतरांच्या क्षमतेवर नियंत्रण करू शकाल. (इतर प्रमुख बदलांच्या वेळेप्रमाणे, जेव्हा हे बदल प्रसिद्ध होण्यास तयार होतील, तेव्हा या बदलांवरील अधिक माहितीसह समर्पित बातमी पोस्ट केली जाईल.)
विशिष्ट कार्य AO3 पृष्ठमांडणी वापरून आपल्यापासून दृष्टीआड करणे हे नेहमीच शक्य होते, तरी आम्ही अलिकडेच विशिष्ट निर्मात्यांची सर्व कार्य लपवणे सुद्धा संभवनीय केले आहे. हे करण्यासाठी, साईट पृष्ठमांडणी निर्मित करा आणि पुढील CSS वापरा:
-
.work-000 { display: none !important; }विशिष्ट कार्य दृष्टिआड करण्यासाठी.000च्या ऐवजी, आपण जे कार्य दृष्टीआड करू इच्छितो त्या कार्याचा आयडी घाला. कार्य आयडी म्हणजे एक आकड्यांची मालिका असेल जी कार्याच्या URL मध्ये सापडू शकेल./works/ह्या नंतर लगेचच आयडी दिसेल, उदा.https://ao3.org/works/000/chapters/123. -
.user-000 { display: none !important; }विशिष्ट वापरकर्त्याची सर्व कार्य दृष्टिआड करण्याकरीता.000च्या ऐवजी, आपण ज्याचे कार्य दृष्टीआड करू इच्छितो त्या वापरकर्त्याचा आयडी घाला. वापरकर्त्याचा आयडी म्हणजे एक आकड्यांची मालिका असेल जी वापरकर्त्याच्या खाते-रेखाचित्रावर "My user ID is" (माझा वापरकर्ता आयडी) विभागामध्ये सापडेल. वापरकर्त्याने नाव बदलले तरी त्याचा आयडी बदलत नाही.
एकापेक्षा अधिक बाबी दृष्टीआड करण्याकरीता, आपण निवडकांच्या मधे अनुस्वार वापरू शकता: .work-000, .work-149319, .user-000 { display: none !important; }
सध्यस्थितीत, ही पद्धत फक्त कार्य सूची व कार्य शोध-परिणामांना लागू आहे, वाचनखूणांना नाही. परंतु, आम्ही ते वाढवून वाचनखूणाही समाविष्ट करण्यास कार्यरत आहोत, व एकदा ते झाले की आमच्याकडे एक अधिक तपशिलवार शिकवणी असेल. (जर आपण .blurb#work_000 हे निवडक वापरून आधीच कार्य दृष्टीआड केली असतील, तर ते कार्यरत राहील, पण भविष्यात ते वाचनखूणा सूची आणि शोध परिणामांपर्यंत पुढे नेले जाणार नाही याची कृपया नोंद असू द्या.)
हे करायला आपेक्षेपेक्षा खूप जास्त वेळ लागत आहे याबद्दल आम्ही खूप दिलगिर आहोत, आणि आमची अशी आशा आहे की ही अद्यतनीत बातमी आपल्याला आमच्या कारणांबद्दल अंतर्दृष्टी देईल.
आम्ही यासंदर्भातील तपशिलांवर कार्यरत असताना कृपया आमच्या बाबतीत संयम ठेवा, व विशेषत: या वर्षा-मधील इथल्या व इतर ठिकाणच्या आपल्या प्रेमळ शब्दांसाठी धन्यवाद. आम्ही आपल्या सर्व ट्विट्स ना किंवा टिप्पण्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नसलो, तरी आपल्या समर्थनाचे आम्हाला खूप कौतुक आहे.
