मी खाते कसे उघडू शकतो?
खाते उघडण्यासाठी आपल्याला निमंत्रण कोड किंवा दुवा गरजेची आहे (अजून माहिती साठी निमंत्रण वाविप्र याचा संदर्भ घ्या). आपणांस निमंत्रण ईमेल मिळाली की, दिलेल्या दुवेचा वापर करून खाते उघड पृष्ठावर जा. आपल्याला दुसऱ्या वापरकर्त्याकडून निमंत्रण दुवा मिळाली असेल तर ती सुद्धा आपल्याला योग्य जागी पोहचवेल. जर आपल्याला साधा कोड मिळाला असेल (अंक व अक्षरांची मालिका), तर दुवा नसलेला निमंत्रण कोड तो मी कसा वापरू शकतो? याचा संदर्भ घ्या.
माझे वापरकर्ता नाम उघडपणे प्रदर्शित केले जाईल का?
होय, म्हणून इतरांनी आपल्याला त्या नावाने ओळखलेले आवडेल असेच नाव निवडण्याची खात्री असू द्या! पण आपण स्युडोआयडी चा वापर करू शकता (याचा संदर्भ घ्या स्युडोआयडी वाविप्र) Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह), आपले वापरकर्ता नाव उघडपणे स्युडोआयडी च्या शेजारी प्रदर्शित केले जाईल. ही जोडणी पुढील प्रमाणे दिसेल:
स्युडोआयडी (वापरकर्ता-नाव)
माझ्या खात्याच्या वापरकर्ता-नावामध्ये कुठल्या प्रकारचे वर्ण वापरण्याची परवानगी आहे?
आपण वापरकर्ता नावात अक्षरे, अंक, व अधोरेखने वापरू शकता. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) च्या तांत्रिक आवश्यकतांमुळे, वापरकर्ता नाव, मोकळी जागा किंवा डायक्रिटिक्स, आणि विरामचिन्हे जसे पूर्णविराम किंवा स्वल्पविराम न वापरता, फक्त मूख्य लॅटिन लिपी वापरून तयार केले जाऊ शकते. त्यांची सुरूवात व शेवट अक्षर किंवा अंकाने झाली असावी, आणि ती कमीतकमी ३ व जास्तीतजास्त ४० वर्ण लांबीची असावी.
वापरू शकणाऱ्या वर्णांची यादी: Aa, Bb, Cc, Dd, Ee, Ff, Gg, Hh, Ii, Jj, Kk, Ll, Mm, Nn, Oo, Pp, Qq, Rr, Ss, Tt, Uu, Vv, Ww, Xx, Yy, Zz, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, _.
आपल्याला जास्त लवचिकता हवी असेल, जसे जागा आणि विशेष वर्ण, आपण स्युडोआयडी तयार करू शकता (हा संदर्भ बघा स्युडोआयडी वाविप्र). आपण स्युडोआयडी वापरले तरी आपले वापरकर्ता नाव उघडपणे स्युडोआयडी च्या शेजारी प्रदर्शित केले जाईल याची नोंद असावी (ते या स्वरूपात असेल "स्युडोआयडी (वापरकर्ता-नाव)"), म्हणून इतरांनी आपल्याला त्या नावाने ओळखलेले आवडेल असेच नाव निवडण्याची खात्री असू द्या!
मी माझे खाते सत्यापित कसे करू?
आपण खाते निर्माण केल्यानंतर, ते कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला एक दुवा प्राप्त होईल. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) तील तुमच्या नवीन खात्यास सत्यापित व कार्यान्वित करण्यासाठी ईमेल मधील दुवेवर जा. खाते बनवल्याच्या १४ दिवसांमध्ये जर तुम्ही ते सत्यापित केले नाहीत तर आपली नोंदणी कालबाह्य होईल व आपणांस खाते निर्मितीच्या प्रक्रियेतून पुन: जावे लागेल. निमंत्रणांबद्दल अधिक माहिती साठी, कृपया हे बघा निमंत्रण वाविप्र.
खाते नोंदवल्याच्या काही तासांमध्ये जर आपल्याला ईमेल मिळाली नाही, तर आपला स्पॅम फिल्टर तपासा. जर ४८ तासांमध्ये आपणांस ईमेल प्राप्त झाली नाही, तर कृपया आधार-समितीशी संपर्क करा व त्यांना खाते कार्यान्वित करण्यास मदतीसाठी विचारा. जेव्हा आपण आधार-समितीशी संपर्क कराल तेव्हा कृपया खाते संदर्भातील ईमेल चा उल्लेख करा. आपल्या ईमेल सर्वर द्वारा अधिसुचनांमध्ये अडथळा येत नाही याची खात्री असण्यासाठी, आपण [email protected] आपल्या सुरक्षा-यादी मध्ये घालू शकता.
जर माझे खाते हॅक झाले आहे असे मला वाटत असेल तर मी काय करावे?
जर आपल्याला शंका असेल की आपले खाते आपल्या परवानगी शिवाय वापरले जात आहे, तर आपले खाते अवांछित हेतूसाठी वापरले जात नाही याची खात्री ठेवण्यासाठी आपण ताबडतोब आपला संकेतशब्द बदलावा आणितक्रार-निवारण समितीशी संपर्क करावा.
माझ्या खात्याशी जुडलेला ईमेल मी कसा बदलू शकतो?
आपण Edit Profile (खाते-रेखाचित्र सुधार) येथे जाऊन, खालील सूचना-क्रम वापरून आपल्या खात्याशी जुडलेला ईमेल बदलू शकता:
- लाॅग-ईन करा, व "Hi (नमस्कार), [वापरकर्ता]" हे अभिवादन निवडून आणि यादीतून "My Dashboard" (माझा डॅशबोर्ड) निवडून किंवा आपल्या खाते-रेखाचित्राचे छायाचित्र निवडून आपल्या डॅशबोर्ड वर जा.
- पृष्ठाच्या एका बाजूच्या (किंवा मोबाईल च्या वरच्या बाजूच्या) यादी मधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- आपल्या खाते-रेखाचित्राच्या खालच्या बाजूस असलेले "Edit My Profile" (माझे खाते-रेखाचित्र सुधारा) हे बटण वापरा.
- पृष्ठ शीर्षलेखाच्या खाली शेवटचा पर्याय असलेले, "Change Email" (ईमेल बदला) बटण वापरा.
- "New Email" (नवीन ईमेल) and "Confirm New Email" (नवीन ईमेल पक्के करा) या फील्ड मध्ये आपला नवीन ईमेल पत्ता घाला.
- "Password" (संकेतशब्द) फील्ड मध्ये आपला संकेतशब्द घाला.
- आपले बदल वचनबद्ध करण्यासाठी "Change Email" (ईमेल बदला) बटण वापरा. आपल्याला आपल्या आधीच्या ईमेल पत्त्यावर बदल कळवणारी ईमेल प्राप्त होईल.
मी माझा संकेतशब्द कसा बदलू शकतो?
आपण Edit Profile (खाते-रेखाचित्र सुधार) येथे जाऊन, खालील सूचना-क्रम वापरून आपल्या खात्याशी जुडलेला संकेतशब्द बदलू शकता:
- लाॅग-ईन करा, व "Hi (नमस्कार), [वापरकर्ता]" हे अभिवादन निवडून आणि यादीतून "My Dashboard" (माझा डॅशबोर्ड) निवडून किंवा आपल्या खाते-रेखाचित्राचे छायाचित्र निवडून आपल्या डॅशबोर्ड वर जा.
- पृष्ठाच्या एका बाजूच्या (किंवा मोबाईल च्या वरच्या बाजूच्या) यादी मधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- आपल्या खाते-रेखाचित्राच्या खालच्या बाजूस असलेले "Edit My Profile" (माझे खाते-रेखाचित्र सुधारा) हे बटण वापरा.
- "Change Password" (संकेतशब्द बदला) बटण वापरा.
- "New Password" (नवीन संकेतशब्द) and "Confirm New Password" (नवीन संकेतशब्द पक्का करा) या फील्ड मध्ये आपला नवीन संकेतशब्द घाला.
- "Password" (संकेतशब्द) फील्ड मध्ये आपला संकेतशब्द घाला.
- आपले बदल वचनबद्ध करण्यासाठी "Change Password" बटण वापरा.
मी माझे वापरकर्ता नाव कसे बदलावे?
आपण वापरकर्ता नाव बदलण्याच्या आधी आपल्याला हे माहिती असू द्या की आपल्या जुन्या वापरकर्ता नावाच्या दुवा आपल्या नवीन नावास आपोआप हस्तांतरित होणार नाहीत. आपल्या वैयक्तिक कार्यांच्या दुवेमध्ये आपले वापरकर्ता नाव नसते व त्यामुळे त्या निकामी होणार नाहीत, पण कुठलिही दुवा जी आपल्या Dashboard (डॅशबोर्ड), Profile (खाते-रेखाचित्र), Works (कार्य) page, Series (मालिका) page, आणि इतर निकामी होतील, कारण आपले वापरकर्ता नाव हे URL (दुवा) चा भाग असते.स्युडोआयडी बनविल्याने अशी समस्या येणार नाही.
आपले वापरकर्ता नाव बदलण्यासाठी:
- लाॅग-ईन करा, व "Hi (नमस्कार), [वापरकर्ता]" हे अभिवादन निवडून आणि यादीतून "My Dashboard" (माझा डॅशबोर्ड) निवडून किंवा आपल्या खाते-रेखाचित्राचे छायाचित्र निवडून आपल्या डॅशबोर्ड वर जा.
- पृष्ठाच्या एका बाजूच्या (किंवा मोबाईल च्या वरच्या बाजूच्या) यादी मधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- आपल्या खाते-रेखाचित्राच्या खालच्या बाजूस असलेले "Edit My Profile" (माझे खाते-रेखाचित्र सुधारा) हे बटण वापरा.
- "Change User Name" (वापरकर्ता नाव बदल) हे बटण निवडा.
- आपले वापरकर्ता नाव व संकेतशब्द असलेला फाॅर्म भरा.
- आपले बदल वचनबद्ध करण्यासाठी "Change User Name" बटण वापरा.
आपले वापरकर्ता नाव अद्वितीय असणे गरजेचे आहे. जे नाव दुसऱ्यांनी आधीच घेतले आहे त्या मध्ये आपण आपले वापरकर्ता नाव बदलू शकत नाही. आपल्याला आवडणार नाव जर कोणी आधीच घेतले असेल, तर स्युडोआयडी चा वापर करण्याचा विचार करा (याचा संदर्भ घ्या स्युडोआयडी वाविप्र).
परंतु, आपल्या वापरकर्ता पृष्ठाचा वेब पत्ता न बदलता, आपण आपल्या विद्यमान नावांमधील कॅपिटलाइजेशन बदलू शकता. वेगळ्या शब्दांमध्ये, जर आपले विद्यमान वापरकर्ता नाव "superfan" असेल, तर कुठलिही दुवा निकामी न करता, आपण खात्याचे नाव बदलून "Superfan", "SuperFan", किंवा "SuPeRfAn" सुद्धा ठेऊ शकता. कॅपिटलाइजेशन बदलत असताना, आपल्या संगणक चाळकाने आपले आधीचे कॅपिटलाइजेशन लक्षात ठेवले नसल्याची खात्री करून घ्या- आपण ते अद्यतनीत करताना काही चाळक आपोआप पुन्हा ते बदलण्याचा प्रयत्न करतात.
वापरकर्ता नाव बदल आपल्या कार्यांवर, वाचनखुणांवर आणि आपल्या खात्याच्या इतर अंशांवर नक्की कसा परिणाम करेल हे जाणून घेण्यासाठी, कृपया हे बघा वापरकर्ता नाव बदल माझ्या खात्यावर काय परिणाम करेल?
वापरकर्ता नाव बदल माझ्या खात्यावर काय परिणाम करेल?
वापरकर्ता नाव बदला मुळे हे होईल:
- आपल्या सर्व कार्यांचे व वाचनखुणांचे वापरकर्ता नाव बदलले जाईल.
- आपण केलेल्या सर्व टिप्पण्यांचे व दिलेल्या टाळ्यांचे वापरकर्ता नाव पूर्ण संस्थळा-भर बदलले जाईल.
- मूलभूत स्युडोआयडीबदलले जाईल.
- URL मध्ये आपले वापरकर्ता नाव समाविष्ट असल्यामुळे, आपल्या खाते-रेखाचित्राच्या दुवा निकामी होतील.
- URL मध्ये आपले वापरकर्ता नाव समाविष्ट असल्यामुळे, आपल्या कार्य सुचीच्या दुवा निकामी होतील.
- आपले वापरकर्ता नाव समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही दुवा निकामी होतील. उदाहरणार्थ, archiveofourown.org/users/$वापरकर्ता नाव/series.
वापरकर्ता नाव बदला मुळे हे होणार नाही:
- आपल्या वापरकर्ता नावाचा उल्लेख थेट दुवांमध्ये नसल्याने, आपल्या वैयक्तिक कार्यांच्या, संकलनांच्या किंवा आव्हानांच्या दुवा निकामी होणार नाहीत. उदाहरणार्थ, आपल्या एका कार्याची दुवा अशा प्रकारे संरचित असू शकते: archiveofourown.org/works/12345678.
- गुगल, बिंग, किंवा याहू सारख्या इंटरनेट शोध सुचीमधल्या आपल्या वापरकर्ता नावात ताबडतोब बदल.
- Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये आपण निर्माण केलेली कार्य, संकलने, सदस्यता, इतिहास, किंवा इतर काही मजकूर हटणे.
या वैशीष्याचा वापर काळजीपूर्वक करा. आपल्या वापरकर्ता नावातील बदल दिसू लागण्यास काही दिवस लागू शकतात याची नोंद असू द्या. एका आठवड्या नंतरही जर आपल्या कार्यांचे, वाचनखुणांचे, संकलनांचे वापरकर्ता नाव बदलले नसेल, तर कृपया आधार-समितीस संपर्क करा.
मी माझा गमावलेले वापरकर्ता नाव किंवा संकेतशब्द पुनर्प्राप्त कसे करू शकतो?
गमावलेला संकेतशब्द आपण या मार्गी पुनर्प्राप्त करावासंकेतशब्द पुनर्प्राप्ती फाॅर्म. आपल्याला आपले वापरकर्ता नाव किंवा आपल्या खात्याशी जुडलेला ईमेल पत्ता संबंधित फिल्ड मध्ये घालावा लागेल व "Reset Password" (संकेतशब्द रीसेट करा) हे बटण वापरावे लागेल. जर आपण आपले वापरकर्ता नाव विसरले असाल, तर आपला ईमेल पत्ता घातल्याने ते पुनर्प्राप्त होईल तसेच आपला संकेतशब्द रीसेट करता येईल. आपले तपशील आपल्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) खात्याशी जुडलेल्या ईमेल पत्त्यावर पाठविले जातील. जर आपण आपल्या AO3 खात्याशी जुडलेल्या ईमेल पत्त्याचा प्रवेश सुद्धा गमावललेला असेल, तर कृपया मदतीसाठी समिती-संवाद समितीशी संपर्क करावा.
मी माझे खाते बंद कसे करू?
आपले खाते बंद केल्याने Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मधून आपली कार्ये काढली जातील. जर आपल्याला आपले खाते बंद करायचे असेल पण आपली कार्ये ॲानलाईन ठेवायची असतील तर आपली कार्ये मुक्त करण्याचा विचार करा (कार्य मुक्तता वाविप्रयाचा संदर्भ घ्या).
आपण आपले खाते खालील प्रमाणे आपल्या Profile (खाते-रेखाचित्र) पृष्ठावरून बंद करू शकता:
- लाॅग-ईन करा, व "Hi (नमस्कार), [वापरकर्ता]" हे अभिवादन निवडून आणि यादीतून "My Dashboard" (माझा डॅशबोर्ड) निवडून किंवा आपल्या खाते-रेखाचित्राचे छायाचित्र निवडून आपल्या डॅशबोर्ड वर जा.
- यादी मधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- खाते- रेखाचित्राच्या खालच्या भागातून "Delete My Account" (माझे खाते बंद करा) हे बटण वापरा. असे करणे कायमसाठी असेल याची नोंद असू द्या. एकदा बंद झालेले खाते पुनर्संचित कुठल्याही मार्गे करता येत नाही.
- जर आपली काही कार्ये असतील तर आपल्याला ती मुक्त करायची आहेत का खोडायची आहेत, असे विचारले जाईल.
खाते बंद केल्याने आपण केलेल्या सर्व टिप्पण्यांवर व दिलेल्या टाळ्यांवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी याचा संदर्भ घ्या मी माझे खाते बंद केल्याने मी केलेल्या टिप्पण्यांचे काय होईल? and मी माझे खाते बंद केल्याने मी दिलेल्या टाळ्यांचे काय होईल? या मध्ये टिप्पण्या व टाळ्या वाविप्र.
मी भेट कशी नाकारू शकतो?
लाॅग-ईन करा, व "Hi (नमस्कार), [वापरकर्ता]" हे अभिवादन निवडून आणि यादीतून "My Dashboard" (माझा डॅशबोर्ड) निवडून किंवा आपल्या खाते-रेखाचित्राचे छायाचित्र निवडून आपल्या डॅशबोर्ड वर जा. पृष्ठाच्या बाजुच्या किंवा मोबाईल साठी पृष्ठाच्या वरच्या बाजुच्या यादीतून "Gifts" (भेट) निवडा. हे आपल्याला भेटींच्या यादीकडे घेऊन जाईल.
कुठल्याही कार्याखाली असलेले "Refuse Gift" (भेट नाकारा) हे बटण निवडा. हे कार्य Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) वर उपलब्ध असेल, पण आपल्या भेटींमध्ये ते दिसणार नाही, आणि आपले वापरकर्ता नाव प्राप्तकर्ता म्हणून कार्य माहिती किंवा त्या कार्याच्या भेट विभागात समाविष्ट नसेल.
आपण भेट नाकारल्यावर कार्य निर्मात्याला सुचित केले जाणार नाही, आणि ते कार्य आपल्याला परत भेट होणार नाही.
भेट प्राप्त झाल्यावर आपल्याला सुचित केलेले आवडणार असेल तर, हे पहा टिप्पण्यांच्या सुचनांचा प्राप्ती मार्ग मी कसा बदलू?. जर आपण आधी नाकारलेली भेट आपल्याला स्वीकारायची असेल तर, याचा संदर्भ घ्या भेट नाकारून झाल्यावर ती स्वीकारण्यासाठी काही मार्ग आहे का?
भेट नाकारून झाल्यावर ती स्वीकारण्यासाठी काही मार्ग आहे का?
होय. लाॅग-ईन करा, व "Hi (नमस्कार), [वापरकर्ता]" हे अभिवादन निवडून आणि यादीतून "My Dashboard" (माझा डॅशबोर्ड) निवडून किंवा आपल्या खाते-रेखाचित्राचे छायाचित्र निवडून आपल्या डॅशबोर्ड वर जा. पृष्ठाच्या बाजुच्या किंवा मोबाईल साठी पृष्ठाच्या वरच्या बाजुच्या यादीतून "Gifts" (भेट) निवडा. हे आपल्याला भेटींच्या यादीकडे घेऊन जाईल.
तिकडून, "Refused Gifts" (नाकारलेल्या भेटी) हे बटण निवडा. हे आपल्याला आपण नाकारलेल्या भेटींच्या यादीकडे घेऊन जाईल. कार्याची स्वीकृती बदलण्यासाठी, कार्याच्या माहिती मधून "Accept Gift" (भेट स्वीकारा) हे बटण निवडा. ते कार्य आपल्या स्वीकारलेल्या भेटींच्या यादीत हलविले जाईल, आणि पुन्हा एकदा आपले वापरकर्ता नाव त्या कार्याच्या माहिती व नोंदींमध्ये प्राप्तकर्ता म्हणून सामिल केले जाईल.
आपण आधी नाकारलेली भेट स्वीकारल्यावर कार्य निर्मात्याला सुचित केले जाणार नाही.
भेट कशी नाकारावी यावरील अधिक माहितीसाठी मी भेट कशी नाकारू? हे पहा.
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्याचे उत्तर कुठे मिळु शकते?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील. नियम आणि ध्येयधोरणविषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही (ज्ञात अडचणी) एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर इथे (समिती-संवाद समिती) संपर्क साधा.
