आमंत्रण म्हणजे काय?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खाते तयार करण्यासाठी तुमच्याकडे आमंत्रण असणे आवश्यक आहे. आमंत्रणे दोन स्वरूपाची असतात: दुवा किंवा अक्षरांकी क्रम (ह्यास बिल्ला देखील म्हणतात).
आमंत्रण-दुवा बद्दल मदत हवी असल्यास मला आमंत्रण दुवा मिळाली आहे, ह्याचा वापर करून खाते कसे तयार करावे? येथे भेट द्या.
आमंत्रण बिल्ला बद्दल माहिती हवी असल्यास आमंत्रण दुवा स्वरूपातील नसल्यास कसे वापरावे? येथे भेट द्या.
आमंत्रण नाहीये परंतु हवे असेल तर मला आमंत्रण कसे मिळवता येईल? येथे भेट द्या.
आमंत्रण नसल्यास मला खाते तयार का करता येणार नाही?
आम्ही आमंत्रण दुवा योजनेचा वापर करून Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ची वाढ ताब्यात ठेवू शकतो. आम्हाला नवीन वापरकर्ता सावकाश वाढवावे लागतात म्हणजे आमचे खाते आमच्या यंत्र, बॅंडविड्थ आणि मदतीदारांच्या आटोक्याच्या बाहेर जाणार नाहीत. ह्यानेकरून AO3 च्या प्रत्येक वापरकर्त्याला शक्य तेवढा उत्तम अनुभव मिळतो.
मला आमंत्रण कसे मिळवता येईल?
आपल्याला आमच्या स्वयंचलित यादीतून किंव्हा Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खाता असलेल्या वापरकर्त्याकडून आमंत्रण मिळू शकते, त्यांच्याकडे जर असतील तर.
स्वयंचलित रांगेतून आमंत्रण मिळवण्यासाठी, "Get Invited!" (आमंत्रण मिळवा!) बटण वर क्लिक करा. ते बटण आमच्या मुखपृष्ठ वर स्वागताच्या खाली सापडेल. मग आपण आपले ईमेल आमंत्रण विनंती यादी मधे घालू शकता. आमंत्रण क्रमाने पाठवले जातील. आपल्या आमंत्रण विनंतीबद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी, आमंत्रण मिळवायला किती वेळ लागेल? वाचा.
AO3 वापरकर्ता नवीन आमंत्रणे मागू शकत नाहीत , पण आपल्याकडे असलेले पाठवू शकतात. हा नियम आव्हान चालविणाऱ्या वापरकर्त्यांना लागू होत नाही (मी चालविणाऱ्या आव्हानासाठी आमंत्रण कशी मागवू? बघा)
हे लक्षात ठेवा की आपले वापरकर्त्याचे नाव आणि कदाचित आपले ईमेल आपल्याला आमंत्रण पाठवलेल्या वापरकर्त्याला माहिती होईल. जर आपल्याला ही माहिती द्यायची नसेल, तर स्वयंचलित रांग आपल्यासाठी जास्त योग्य ठरेल.
वापरकर्ता असून इतरांना आमंत्रण कसे पाठवता येईल याच्याबद्दल माहिती हवी असल्यास, माझ्याकडे खाता आहे, मी इतरांना कसे आमंत्रण देऊ शकते? बघा.
आमंत्रण मिळवायला किती वेळ लागेल?
सध्या किती लोक प्रतीक्षा यादीवर आहेत आणि आम्ही दिवसाला किती आमंत्रणे पाठवत आहोत हे Invite Requests (आमंत्रण विनंती) पृष्ठ वर दिसेल. ही माहिती वापरुन आपल्याला अंदाज येईल की आपल्याला कधी आमंत्रण मिळेल. आम्ही दिवसाला किती आमंत्रणे पाठवू शकतो हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते, त्यामुळे ते बदलू शकते. हे पृष्ठ बघण्यासाठी, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मुखपृष्ठ लॉग आऊट असताना उघडा आणि स्वागताच्या खालचे "Get Invited!" (आमंत्रण मिळवा!) बटण क्लिक करा.
आपण या रांगेत कुठे आहोत हे पण बघू शकता. आमंत्रण विनंती पृष्ठावर "check your position on the waiting list" (प्रतीक्षा यादीत आपली जागा बघा) वर क्लिक करा आणि तुम्ही आमंत्रण विनंती करताना दिलेले ईमेल लिहा व "Look me up" (मला शोधा) क्लिक करा. सध्या आमंत्रण पाठवण्याच्या गतीप्रमाणे व आपल्या जागेप्रमाणे आपल्याला आमंत्रण कधी मिळेल याचा अंदाज येईल.
देणगी दिल्यावर आमंत्रण लवकर मिळते का?
नाही, आम्ही देणगीच्या बदल्यात Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) आमंत्रण देत नाही. AO3 ही प्रत्येक रसिकासाठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून निःशुल्क सेवा म्हणून उपलब्ध असावे हे आमचे वचन आहे. ह्यामुळे आम्ही जरी OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ला देणगी करणाऱ्या रसिकांच्या आर्थिक मदतीसाठी खूप आभारी असू तरी हे करून तुम्हाला जास्त लवकर आमंत्रण मिळणार नाही.
मला आमंत्रण दुवा मिळाली आहे, ह्याचा वापर करून खाते कसे तयार करावे?
आपल्याला जर आमंत्रण दुवा मिळाली असेल तर दुवा वर क्लिक करा किंव्हा दुवा पूर्णपणे आपल्या ब्राऊझर मधे पत्ता म्हणून उतरवून घ्या. आपल्याला मग नवीन नोंदणी पृष्ठ दिसेल.
जर आपल्याला मिळालेले आमंत्रण दुवा नसेल, तर आमंत्रण दुवा स्वरूपातील नसल्यास कसे वापरावे? वाचा.
आमंत्रण दुवा स्वरूपातील नसल्यास कसे वापरावे?
जर आपल्याला दुसऱ्या वापरकर्त्याकडून आमंत्रण मिळाले आहे जे दुवा नसून अक्षरांक माला आहे, तर आपल्या ब्राऊझर मधे हा पत्ता द्या, https://archiveofourown.org/signup/####, फक्त "####" च्या जागी आपल्याला दिलेली अक्षरांक माला लिहा. आपल्याला आता नवीन नोंदणी पृष्ठ दिसायला हवे. त्याच्यापुढे काय करावे ह्याची माहिती मी खाता कसे बनवू? इथे दिली आहे.
मी चालविणाऱ्या आव्हानासाठी आमंत्रणे कशी मागवू?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरच्या भेटींची देवाणघेवाण व विस्तारासाठी कल्पनाबीज यात भाग घेण्यासाठी खाता असणे आवश्यक आहे.
जर आपल्याला स्वतः चालविणाऱ्या आव्हानासाठीखाते मागवायचे असतील तर समिती-संवाद समितीशी संपर्क साधा व त्यांना आव्हानाचे नाव, नोंदणींची पहिली व अंतिम तारीख, आव्हानचालकचा खाता, ज्याला आमंत्रणे पाठवायची आहेत आणि लागणाऱ्या आमंत्रणांची संख्या ही सगळी माहिती द्या. समिती-संवाद समिती आपल्याला आमंत्रणे दिल्यावर अर्जाला उत्तर देईल. आपल्याला मग ते आव्हानात भाग घेणाऱ्या लोकांना आमंत्रणे पाठवता येतील. यासाठी माझ्याकडे खाता आहे, मी इतरांना आमंत्रणे कसे देऊ?मधे दिलेल्या सूचना बघा.
माझ्याकडे खाता आहे, मी इतरांना आमंत्रणे कसे देऊ?[लक्षात ठेवा: "दुवा उतरवून घेणे" म्हणजे तुमच्या ब्राऊझर मधे "राईट क्लिक, लिंक पत्ता कॉपी करा" किंव्हा त्यासमान क्रिया. ही AO3 आंतरपृष्ठचा भाग नाही ]
जर आपल्याकडे खात्यात न पाठवलेले आमंत्रणे असतील तर आपण ही आमंत्रणे खालील क्रमाने इतरांना पाठवू शकता.
कोणालातरी आमंत्रण पाठवण्यासाठी आधी:
- लॉग ईन करा आणि "Hi, [username]!" (नमस्कार, [सदस्यनाम]!) वर क्लिक करून सूची मधून "My Dashboard" (माझा दर्शनीफळ) वर जा आणि आपला दर्शनी फळा बघा. हे आपल्या खाते रेखचित्रावर जाऊन सुद्धा दिसेल.
- "Invitations" (आमंत्रणे) बटण हे कॉम्प्युटर वर उजवीकडे वरती (किंव्हा मोबाईल वर वापरकर्त्याचे नाव याखाली) सापडेल. इथून आपल्याला आमंत्रणे पृष्ठावर जाता येईल, जिथे आपल्याला उपलब्ध आमंत्रणे दिसतील.
आमंत्रणे पृष्ठावरून अनेक उपाय आहेत:
- आपल्याला आमंत्रण ज्यांना पाठवायचे आहे त्यांचा ईमेल पत्ता लिहा, एक आमंत्रण कोड निवडा (आपल्याला उपलब्ध असलेले आमंत्रणे पैकिल ५ पर्यंत दिसतील) आणि "Send Invitation" (आमंत्रण पाठवा) वर क्लिक करा.
- आमंत्रण पत्ता उतरवून घ्या आणि त्या व्यक्तिला परस्पर अश्याप्रकारे पाठवा:
- कॉम्प्युटरवर वरच्या बाजूला उजवीकडे (व मोबाईलवर "Invite a friend" (मित्राला आमंत्रण द्या) याखाली) "Manage Invitations" (आमंत्रणांचा बंदोबस्त करणे) बटणवर क्लिक करा. आपण ज्या पृष्ठावर पोचाल तिथे तुमच्या खात्याला उपलब्ध केलेल्या सर्व आमंत्रणांची स्थिति दिसेल, वापरलेल्या आमंत्रणांसहित.
- "copy and use" (कॉपी आणि वापरा) भागातून कोणत्याही न वापरलेल्या आमंत्रण कॉपी करा (पण उघडू नका). हे कसे करायचे ते आपल्या कॉम्प्युटर किंवा इतर साधनांवर अवलंबून:
- विंडोज कॉम्प्युटर वर दुवावर राईट क्लिक करा आणि "कॉपी लिंक" निवडा (आपल्या ब्राऊजरप्रमाणे शब्द वेगळे असू शकतात).
- मॅक ओ. एस. मधे: दुवा वर कंट्रोल-क्लिक करा आणि "कॉपी लिंक" निवडा (आपल्या ब्राऊजरप्रमाणे शब्द वेगळे असू शकतात)
- मोबाईल साधनावर: दुवावर जास्त वेळ क्लिक करा आणि "कॉपी लिंक" निवडा (आपल्या ब्राऊजरप्रमाणे शब्द वेगळे असू शकतात)
- दुवा चॅट, एसएमएस, ईमेल किंवा इतर संपर्क साधनाने आपल्याला हवे असलेल्या व्यक्तिला पाठवा. ते ही दुवा वापरुन खाता उघडू शकतात.
त्याऐवजी आपण आमंत्रण बिल्ला (अक्षरांकी क्रम) कॉपी करून आमंत्रित व्यक्तिला पाठवू शकता. त्यांना मग आमंत्रण दुवा स्वरूपातील नसल्यास कसे वापरावे? मधे दिलेल्या सूचना पाळाव्या लागतील.
आपण कधीही आमंत्रणे परत पाठवू शकता आणि ईमेल पत्ता बदलू शकता, जोपर्यंत ते आमंत्रण वापरले नाही आहे. ईमेल पत्ता बदलून आपल्याला न वापरलेली आमंत्रणे परत इतर वापरकर्त्यांना पाठवता येतील. अधिक माहितीसाठी मी AO3 वापरकर्ता आहे. माझ्या आमंत्रणांचा बंदोबस्त कसा करू? बघा.
जर आपल्याकडे कोणतेही आमंत्रण उपलब्ध नसेल तर आपल्या आमंत्रित व्यक्तिला आमंत्रण विनंती पृष्ठवर आमंत्रण विनंती नोंदवावी लागेल. जरी आमंत्रणे व आमंत्रणांचा बंदोबस्त करणे पृष्ठावर "Request Invitations" (आमंत्रण विनंती करा) बटण असले तरी ते बटण क्लिक करून आता आमंत्रण विनंती नोंदवली जाणार नाही. आपल्याला स्वतःच्या भेटींची देवाणघेवाण किंवा विस्तारासाठी कल्पनाबीज साठी आमंत्रणे हवी असल्यास, अधिक माहितीसाठी मी चालविणाऱ्या आव्हानासाठी आमंत्रणे कशी मागवू? वाचा.
मी AO3 वापरकर्ता आहे. माझ्या आमंत्रणांचा बंदोबस्त कसा करू?
- लॉग ईन करून "Hi, [username]!" (नमस्कार, [सदस्यनाम]!) क्लिक करून "My Dashboard" (माझा दर्शनी फळ) निवडा किंवा आपले खाते रेखाचित्र क्लिक करून दर्शनी फळा ला जा.
- कॉम्प्युटर वर उजवीकडे वरती "Invitations" (आमंत्रणे) बटण क्लिक करा (किंवा मोबाईलवर आपल्या वापरकर्ता नावाखाली). ह्याने आपण आमंत्रणे पृष्ठावर पोचाल , जिथे आपल्याला किती आमंत्रणे उपलब्ध आहेत हे दिसेल.
- "Manage Invitations" आ(मंत्रणांचा बंदोबस्त करणे) बटण कॉम्प्युटर वर उजवीकडे वरती (मोबाईलवर "Invite a friend" (मित्राला आमंत्रण द्या) याखाली) सापडेल. ते क्लिक केल्यावर आपल्याला जे पृष्ठ दिसेल त्यावर आपल्याला उपलब्ध केलेल्या सगळ्या आमंत्रणांची स्थिति दिसेल, वापरलेले आमंत्रणांसाहित
आमंत्रणांचा बंदोबस्त करणे पृष्ठावर आपण आपल्या आमंत्रणांची छाननी करू शकता. हे करण्यासाठी सर्वात वरच्या ओळीतल्या "Unsent (#)" (न पाठवलेले), "Sent But Unused (#)" (पाठवलेले पण न वापरलेले), "Used (#)" (वापरलेले) किंवा "All" (सगळे) बटण वापरा.
"Unsent (#)" पृष्ठावर दिलेली आमंत्रणे उपलब्ध आहेत आणि पाठवली जाऊ शकतात. "Used (#)" पृष्ठावर त्या आमंत्रणाने खाता तयार केलेल्या व्यक्तीचे वापरकर्ता नाव आणि कदाचित ईमेल दिलेला असेल. एकदा एक आमंत्रण खाता तयार करायला वापरले गेले, की ते परत वापरता येणार नाही.
"Sent But Unused (#)" खाली आपल्याला न वापरलेली आमंत्रणे दिसतील, व गरज असल्यास, आपण आमंत्रण मिळणारा ईमेल पत्ता बदलू किंवा अद्ययावत करू शकता. उजव्या बाजूतून आमंत्रण बिल्ला क्लिक केला तर त्याच्या आमंत्रण दाखवा पृष्ठावर जाता येईल, जिथे त्या आमंत्रणाबद्दल माहिती दिसेल. ईमेल अद्ययावत करण्यासाठी, तिथे असेलेल्या जागी नवीन ईमेल पत्ता लिहा आणि "Update Invitation" (आमंत्रण अद्ययावत करा) बटण क्लिक करा. आपण आमंत्रण कॉपी करून आमंत्रित व्यक्तिला देखील पाठवू शकता. अधिक माहितीसाठी माझ्याकडे खाता आहे, मी इतरांना आमंत्रणे कसे देऊ? बघा.
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.
