Post Header
उमेदवार घोषणा
OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने २०२४च्या निवडणुकींसाठीच्या आमच्या उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):
- C. Ryan S.
- Erica F.
- Rachel L.
- Tish S.
कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि उमेदवार ४ आहेत, २०२४ वर्षाची निवडणुक स्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील.
निवडणुक समिती OTWच्या सर्व सदस्यांना उमेदवारांची ओळख करून देण्यास उत्साहित आहे! या नोंद मध्ये उमेदवारांनी लिहिलेल्या संक्षिप्त जीवनचरित्राची व व्यासपीठसाठीच्या दुवा समाविष्ट आहेत. मतदान करण्याचा काळ व मतदान कसे करता येईल या बद्दल माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येईल.
तोवर, तुमच्या संदर्भासाठी निवडणुकीच्या कार्यक्रमांची कालरेषा इथे उपलब्ध आहे. उमेदवारांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी व तुमचे प्रश्न प्रस्तुत कसे करावे, हे जाणून घेणियासाठी पुढे वाचा!
व्यासपीठ आणि जीवनचरित्र
आम्ही प्रत्येक उमेदवाराला त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र, ज्यात त्यांचा व्यावसायीक व रसिक अनुभव असतील, आम्हाला प्रदान करण्यास सांगितले, व त्याच बरोबर खालील प्रश्नांची उत्तरे देवुन त्यांच्या कालावधीतील त्यांचे ध्येय यांवर व्यासपीठ लिहावयास सांगितले:
- तुम्ही मंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यायचे का ठरवले?
- तुम्ही कुठले कौशल्य आणि/किंवा अनुभव मंडळास प्रदान करू शकता?
- OTWसाठी एक किंवा दोन ध्येय निवडा जी तुम्हाला महत्वाची वाटतात व ज्यासाठी तुम्ही तुमच्या कालावधीत काम करण्यास इच्छुक असाल. तुम्हाला ही ध्येय मौल्यवान का वाटतात? तुम्ही ही ध्येय पूर्ण करायला इतरांसेबत कसे काम कराल?
- OTWच्या प्रकल्पांसदर्भात तुम्हाला काय अनुभव आहे आणि ह्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी व त्यांना अजून बळकट बनविण्यासाठी तुम्ही संबंधित समितींना कसा सहयोग द्याल? विविध श्रेणीतील प्रकल्पांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा, पण तुमही मुक्तपणे अशांवर भर देवू शकता ज्यांचा तुम्हाला अनुभव आहे.
- तुम्ही तुमच्या मंडळाचे काम व OTW मधल्या तुमच्या इतर भुमिकांमधे कसा समतोल साधाल, किंवा मंडळाच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तुमच्या सध्याच्या भूमिकेचे हस्तांतरण कसे कराल?
तुम्ही उमेदवारांची या प्रश्नांवरील उत्तरे व त्यांचे जीवनचरित्र खालील दुवेला अनुसरून वाचू शकता.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.
