Post Header
निवडणूक खुली आहे!
प्रत्येक नवीन OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) सदस्य जे जुलै १, २०२४ ते जून ३०, २०२५ मध्ये दाखल झाले आहेत त्यांना मतपत्रिका प्राप्त झाली असेल. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमचे स्पॅम फोल्डर आधी तपासा, व नंतर आमच्याशी या तर्फे संपर्क करा संपर्क फाॅर्म. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल कि आपली देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली गेली आहे कि नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरील संपर्क फॉर्म वापरून व "Is my membership current/Am I eligible to vote?(माझे सभासदत्व चालू आहे का/मी मतदान करण्यास पात्र आहे का?)" हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.
निवडणूक ऑगस्ट १८, २०२५ या दिवशी चालू असेल, २३:५९ UTC; ही वेळ तुमच्या साठी कुठली असेल हे जाणून घेण्यासाठी, वेळ क्षेत्र कन्व्हर्टर हे पहा.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.