Post Header

Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह) वाढत राहतोय व नवीन टप्पे गाठतोय. केवळ या एका वर्षात, आपण नव्वद लाख वापरकर्ते, दहा लाख मँडरीन चिनी रसिककृती, आणि १ करोड़ ५० लाख रसिककृती झाल्याचा आनंद साजरा केला—आपण कधी विचार केलाय का, की हे सगळं चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे काय काम होत असे?
आपली उदार देणगी ज्या ठिकाणांना पोचते, त्यापैकी एक आहे आमची तांत्रिक व्यवस्था समिती. ही समिती AO3चा माहितीसाठा व त्याच्या शोध प्रणालींना चलित ठेवणाऱ्या सर्व्हर्सना अपग्रेड करण्याचा कठीण कामात व्यस्त आहेत, जेणे करून या सतत वाढणाऱ्या वापरकर्ते व क्रियाकलापाला आम्ही सांभाळू शकू.
तांत्रिक व्यवस्था समिती OTW's (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ)च्या प्रकल्पांना चलित ठेवणारी पायाभूत सुविधा व त्या सोबत अंतर्गत प्रणालींची देखभाल करते. याच्यात आमचे तीन सर्व्हर रॅक्स, पुष्कळ सर्व्हर्स, आणि नेटवर्किंक उपकरणे समाविष्ट आहेत, जे आपण इथे खाली पाहू शकता. आमची सर्व-स्वयंसेवक टोळी या सर्व्हऱ्सचे नियमितपणे निरीक्षण करते आणि शक्य तितक्या लवकर आउटेजला प्रतिसाद देऊन सर्व्हिस पुनर्संचयित करते. या सोबत, ते नित्यक्रमित अपग्रेड आणि व्यवस्थापना करतात जेणेकरून OTWचे प्रकल्प उपलब्ध राहतील ह्याची खात्री असेल. काहीदा ते AO3च्या पायाभूत व्यवस्था बाबत शवविच्छेदन आणि सादरीकरण AO3_तांत्रिक_व्यवस्था AO3 खात्यावर प्रकाशित करतात.
आम्ही या सदस्यता मोहीमेसाठी बरेच देणगी भेट वस्तु सुद्धा तयार केले आहेत! दर वेळी सारखे, आमचा US$४५ स्टिकर संच आहे. US$७५च्या पातळीवर आमची या वर्षाची पिन (फुलपाखरूच्या रूपात AO3चा लोगो!) आणि AO3 व OTWच्या लोगोजची एक नवी फिरणारी कीचेन. या महिन्यात, आम्ही आमच्या जुन्या डफल बॅगेच्या जागी एक पाण्याची बाटली + पिन काॅम्बो ठेवला आहे.
जर आपल्याला भेट हवी असेल पण एका वेळीच सर्व देणगी नाही द्याची असेल, आपण असे करू शकता की एक आवर्ती देणगी लावून आपल्या पसंतीच्या भेटीकडे बचत करू शकता. देणगी पत्रावर आपल्या पसंतीची भेट निवडा, आणि जर आपण एकाच वेळी त्या भेटीसाठी देणगी द्यायला नाही निवडले, तर आपोआप ते आवर्ती देणगी म्हणून सेट होईल. जे कोणी आपण अमेरिकेत आहात, आपण एमप्लाॅयर मॅचिंग द्वारे आपले यागदान दुप्पट करू शकता: आपल्या HR विभागाशी संपर्क साधून माहिती करा की हा पर्याय आपल्या उपलब्ध आहे की नाही.
US$१० व त्याहून जास्तीची देणगी द्वारे आपण OTWचे सदस्य सुद्धा बनू शकता. OTWचे सदस्य संचालक मंडळ—OTWची प्रशासकीय शाखा—याच्या निवडणुकांमध्ये मत घालू शकतात. जर आपल्यास पुढच्या वर्षाची निवडणूक, जे पुढच्या वर्षी ऑगस्ट मध्ये होणार, त्यात मत घालाचे असेल तर आपल्याकडे जून ३०, २०२६ पर्यंत वेळ आहे सदस्य बनण्यासाठी.
जरी आमची ही आशा आहे की आपण ही संधी साधून आम्हास देणगी द्याल व OTW मध्ये सामील व्हाल, तरी आम्ही या समुदायाच्या सदस्यांकडण जो पाठिंबा मिळतो, कुठल्याही तऱ्हेचा, त्यासाठी आभारी आहोत! तुम्ही AO3वर रसिककृती तयार करता, शेएर करता, त्यावर टिप्पणी करता किंवा टाळ्या देता; फॅनलोरचं संपादन करता; Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) वाचता; किंवा Legal Advocacy (कायदेविषयक मदत) मधली माहिती पसरवता, तर आपण सर्व जण OTW आणि त्याचा प्रकल्पांना आकार देण्यात मदत करता. आपला वेळ, आपली ऊर्जा, व आपल्या प्रतिबद्धतासाठी आम्ही आभारी आहोत!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.






