AO3 News

Post Header

OTW सदस्यत्व मोहीम, १७-१९ ऑक्टोबर २०२५

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम आता संपली आहे आणि आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की आपल्याला एकूण US$२८८,६९२.२८ देणगी मिळाली आहे. आम्ही खास करून खुश आहोत की ७,३३९ दात्यांनी देणगी देऊन त्यांचे OTW सदस्यत्व चालू ठेवले किंवा नवीन सदस्य झाले, ज्यानेकरून आमचा ४,५०० सदस्यांचा ध्येय पूर्ण झाला.

या देणग्या एकूण ७९ देशातल्या ८,७५३ लोकांनी दिल्या: त्या सर्वांना धन्यवाद आणि मोहिमेबद्दल प्रसार केलेल्या आपल्यापैकी सर्वांनाही धन्यवाद. OTW हे त्याच्या जगभरातल्या वापरकर्त्यांशिवाय शक्यच नसते, आणि की आपण सतत आमच्या पाठीशी आहात ही आमच्यासाठी एक गर्वाची व आनंदाची गोष्ट आहे! रसिककृती आणि रसिक संस्कृतीच्या इतिहासाला पाठिंबा आणि पोहच देणे व त्यांचे संरक्षण करणे या आमच्या चलित कामगिरीला सर्वात महत्त्वाची लोकं - म्हणजे रसिक - यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे हे बघून आम्ही खूप संतुष्ट आहोत.

जर आपल्याला देणगी द्यायची होती किंवा सदस्य व्हायचे होते पण आपण अजून ते केले नसेल तर चिंता करू नका! OTW वर्षभर देणग्या स्वीकारते आणि आपण US$१० किंवा जास्तीची देणगी देऊन सदस्य होऊ शकता. सदस्यत्व नेहमी आपल्या देणगीच्या तारखेपासून एक वर्षासाठी चालते त्यामुळे आपण आत्ता देणगी दिली तर आपण २०२६ OTW संचालक मंडळाच्या निवडणूकीत मत देऊ शकता जे ऑगस्ट मधे होतात. आणि आमची खास धन्यवाद म्हणण्यासाठीची भेट आपण कधी देणगी द्याल तेव्हा उपलब्ध होते.

पुन्हा एकदा आमच्या दात्यांना, स्वयंसेवकांना आणि सगळ्यांना जे OTW आणि त्याच्या प्रकल्पांना मदत करतात, या सर्वांना धन्यवाद. भविष्यात अजून कोणते टप्पे आम्ही गाठू हे बघायला आम्ही आतुरतेने वाट बघतो.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.