Post Header
आमच्या पुढील प्रकाशनामध्ये, आम्ही Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) च्या टिप्पण्यांमध्ये दोन बदल करीत आहोत. पहिला बदल कार्य निर्माते व साईट प्रशासक दोघांना टिप्पण्या धागा रोखून ठेवण्याची क्षमता देईल. जसे निर्मात्यांना त्यांच्या कार्यांवर टिप्पण्या रोखण्याचा पर्याय असतो, तसे दूसरा बदल साईट प्रशासकांना बातम्या पोस्ट वर टिप्पण्या रोखण्याचा पर्याय देईल.
टिप्पण्या रोखणे
निर्मात्यांना लवकरच त्यांच्या कार्यावरील टिप्पण्या धागे "Freeze Thread" (धागा रोखा) बटण वापरून रोखता येतील. धागा रोखल्याने टिप्पणीवर येणारी किंवा प्रत्युत्तरांवर येणारी नवीन प्रत्युत्तरे थांबवता येतात. यामुळे धाग्यांमधील टिप्पणायंमध्ये बदल करणे ही रोखले जाते.
रोखलेल्या टिप्पण्यांवर "Frozen" (रोखलेले) सूचक असेल आणि "Reply" (प्रत्युत्तर द्या) बटण लपलेले असेल. "Unfreeze Thread" (धागा रोखणे रद्द करा) पर्याय निर्मात्यांना प्रत्युत्तरे परत सक्षम करण्यास अनुमती देईल.
“धागा रोखा” सुरुवातीला त्या धाग्यातील सर्व प्रत्युत्तरे रोखत असले, तरी निर्माते “धागा रोखणे रद्द करा” वापरून धाग्यातील काही टिप्पण्यांच्या प्रत्युत्तरांना निवडकपणे सक्षम करू शकतात.
AO3 प्रशासक सुद्धा बातमी पोस्ट वरील टिप्पण्या रोखू शकतील, आणि नियम व तक्रार निवारण समिती संघ साईट वर कुठेही टिप्पण्या रोखू शकतील.
बातमी पोस्ट टिप्पणी सेटिंग्ज
ॲागस्ट मध्ये आम्ही निर्मात्यांना त्यांच्या कार्यांवर कोण टिप्पणी करू शकेल यावर अधिक नियंत्रण दिले होते, कोणालाही टिप्पणी करण्यास परवानगी, टिप्पण्या नोंदणीकृत वापरकर्त्यांपुरत्या मर्यादित ठेवणे, किंवा टिप्पण्या पूर्णपणे बंद करणे हे पर्याय निवडण्यासाठी त्यांना सक्षम केले होते.
AO3 प्रशासकांनाही बातमी पोस्ट निर्माण करताना व त्यात बदल करताना, लवकरच हे पर्याय उपलब्ध केले जातील. यामुळे आमचा संघ कालबाह्य बातमी पोस्ट वरील टिप्पण्या बंद करू शकेल आणि नवीन पोस्ट ना स्पॅम (उदा. जाहिराती, किंवा सहसा, बाॅट्स नी सोडलेल्या अनियमित अक्षरांच्या मालिका) मुळे जेरीस येण्यापासून थांबवू शकेल.
जर बातमी पोस्ट वरील टिप्पण्या बंद केलेल्या असतील, किंवा आपण लाॅग्ड आऊट असाल आणि टिप्पण्या फक्त नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी मर्यादित केलेल्या असतील, तर टिप्पणी फाॅर्मच्या जागी, कुठले सेटिंग वापरले जात आहे हा संदेश दिसेल.
जर आपण बातमी पोस्ट वर टिप्पणी करू शकत नसाल तर आपण कधीही समिती-संवाद समितीशी संपर्क साधून अभिप्राय देऊ शकता.
आम्ही आशा करतो की हे दोन्ही बदल AO3 वरील वाचन करणाऱ्या, लिहिणाऱ्या, व टिप्पण्या प्राप्त करणाऱ्या वापरकर्त्यांना व स्वयंसेवकांना मदतीचे असतील.
संपादन, १२ फेब्रुवारी, २१:२० UTC: पोस्टच्या इंग्रजी आवृत्तीवरील विषयेतर चर्चा, ट्रोलिंग आणि छळ, यामुळे या पोस्टवरील टिप्पण्या अक्षम केल्या गेल्या आहेत.
