Post Header
१० जुलै २०२३ रोजी अंदाजे दुपारी १२ UTC वाजे पासून ते ११ जुलै रोजी संध्याकाळी ४ UTC वाजे पर्यंत, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनुपलब्ध होते. या धोक्याचा सामना करण्यासाठी आम्ही AO3 च्या तांत्रिक सेटअपमध्ये अनेक बदल केले आहेत.
हल्ले अजून थांबलेले नाहीत, पण AO3 ला कमीत कमी व्यत्यय आणण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करत आहोत. या हल्ल्यांसाठी कोण जबाबदार आहे किंवा त्यामागील प्रेरणा आम्हाला माहित नाही. एका ऑनलाइन गटाने जबाबदारी स्वीकारले आहे, परंतु या दाव्यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. एकाधिक सायबरसुरक्षा तज्ञांच्या मते, ते माहितीचे विश्वसनीय स्रोत नाहीत आणि ते त्यांची संलग्नता आणि त्यांचे हेतू दोन्ही चुकीच्या पद्धतीने मांडतात. तुम्हाला या गटाकडून, किंवा इतर कोणाचेही दावे दिसले की त्यांना कोण जबाबदार आहे हे माहित आहे, तर आम्ही त्यांना संशयाने बघावे याची शिफारस करतो. शिवाय, आम्ही तुम्हाला विनंती करतो की ते ज्या गटांचे प्रतिनिधित्व करतात किंवा ज्यांचा त्यांनी दावा केला आहे त्यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तृत्व करू नका.
परिस्थिती जसजशी समोर येईल तसतसे आम्ही द्रुत अद्यतने प्रदान करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत AO3_Status Twitter आणि ao3org Tumblr वर. तथापि, आम्हाला माहित आहे की प्रत्येकजण त्या खात्यांचे अनुसरण करत नाही किंवा या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकत नाही, म्हणून तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे:
- कोणतेही AO3 डेटा तडजोड झालेले नाही. तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा खाजगी माहितीची काळजी करण्याची गरज नाही. तथापि, आपण अद्याप असे करू इच्छित असल्यास,तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी किंवा तुमच्या खात्याशी संबंधित ईमेल अद्यतन करण्यासाठी आमच्या वाविप्र मध्ये सूचना आहेत.
- हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही अनेक भिन्न शमन आणि अवरोधित करण्याच्या पद्धती आणि सेटिंग्ज बदल करण्याचा प्रयत्न केला. याने मधूनमधून साइट वर आणली, परंतु हल्ला रोखण्यासाठी ते पुरेसे नव्हते. अखेरीस, आम्ही Cloudflare चा अंडर अटॅक मोड तात्पुरता—आणि अत्यंत प्रभावी—उपाय म्हणून लागू केला. Cloudflare ही एक सेवा आहे जी आमचे सर्व्हर आणि इंटरनेट दरम्यान अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. अटॅक मोड AO3 च्या सेटअपचा कायमस्वरूपी भाग असणार नाही. सर्व सामग्री अजूनही आमच्या सर्व्हरवर राहते.
- जेव्हा तुम्ही AO3 पृष्ठावर प्रवेश करता तेव्हा तुम्हाला कदाचित एक कॅप्चा आव्हान दिसत असेल. ह्याच्यानी AO3 खात्री करू शकते की तुम्ही मनुष्य आहात आणि रोबोट नाही. आम्हाला माहित आहे की ते त्रासदायक आहे आणि आम्ही दिलगीर आहोत! आम्हाला हे देखील माहित आहे की काही ब्राउझर आणि जुनी उपकरणे सध्या AO3 मध्ये प्रवेश करण्यास सक्षम नाहीत. हे उपाय तात्पुरते आहेत आणि हल्ला थांबल्यानंतर ह्या उपयांचं पुन्हा मूल्यांकन केले जाईल.
- AO3 व्यतिरिक्त, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) वेबसाइट आणि आमचा देणगी फॉर्म (जे तृतीय-पक्ष सेवेचा वापर करून होस्ट केले जाते) दोन्हीही लक्ष्यित होते. आम्ही वेबसाइट्स परत आणण्यावरही काम करत आहोत, परंतु आमची देणगी तृतीय-पक्ष सेवेद्वारे जात असल्याने, देणगीदार त्यात कधी प्रवेश करू शकतील हे आम्ही सांगू शकत नाही.
- आमचा देणगी फॉर्म दुर्गम असताना, एका स्कॅमरने ट्विटरवरील @AO3_Status खात्याची खोटी बतावणी करून चाहत्यांकडून पैसे मिळविण्यासाठी थोडक्यात तोतयागिरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे खाते आता निलंबित करण्यात आले आहे. कृपया यावेळी OTW किंवा त्याच्या प्रकल्पांसाठी देणग्या मिळविण्याच्या कोणत्याही प्रयत्नांपासून सावध रहा, कारण इतर स्कॅमर कामावर असू शकतात. साइटवर प्रवेश केल्यावरच आम्ही आमच्या वेबसाइटद्वारे देणग्या स्वीकारू शकतो.
- सध्या, आम्ही मदतीबद्दल अभिप्रायपत्र आणि नियम आणि तक्रारनिवारण अहवाल पृष्ठ अक्षम केले आहे. विशेषत: नियम आणि तक्रारनिवारण अहवाल पृष्ठाला हल्ल्याचा एक भाग म्हणून स्पॅमच्या मोठ्या प्रवाहाने लक्ष्य केले जात होते. म्हणूनच फॉर्ममध्ये आपात्कालीन "Sorry, you have been blocked" (माफ करा, तुम्हाला अवरोधित केले गेले आहे) सुरक्षा चेतावणी आहे. आपण ते पाहिल्यास, कृपया काळजी करू नका; तुम्हाला प्रत्यक्षात अवरोधित केले गेले नाही!
- आम्ही नवीन AO3 खात्यांसाठी स्पॅमरच्या विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून आमंत्रण विनंत्या बंद केल्या आहेत. तुमच्याकडे आधीच आमंत्रण असल्यास, तुम्ही ते खाते तयार करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही रांगेत असाल आणि आमंत्रणाची वाट पाहत असाल, तर काही दिवस लागतील. आम्ही पुन्हा आमंत्रणे पाठवल्यास आम्ही तुम्हाला Twitter आणि Tumblr वर कळवू.
- तुम्ही मदत करण्यासाठी काय करू शकता? सामान्यपणे AO3 ब्राउझ करत रहा. तुम्ही नेहमी करता त्याप्रमाणे एकमेकांच्या कामांना टाळ्या द्या आणि बुकमार्क करा, नवीन कामे आणि प्रकरण प्रकाशित करा आणि भरपूर टिप्पण्या द्या! साइट लोड होण्यास थोडी धीमी असल्यास, पुन्हा प्रयत्न करा. AO3 प्रत्येकासाठी शक्य तितक्या सहजतेने कार्य करते याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वकाही करत राहू, परंतु हे हल्ले सुरू असताना अधूनमधून उचकी येऊ शकते.
आम्ही या पोस्टवरील टिप्पण्या अक्षम करत आहोत कारण ही परिस्थिती अजूनही उलगडत आहे आणि आमच्या सर्व-स्वयंसेवक संघाचे सर्व लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे आम्ही यावेळी येथे टिप्पण्यांचे निरीक्षण करू शकत नाही किंवा त्यांना उत्तर देऊ शकत नाही.
तथापि, कृपया हे जाणून घ्या की आपण गेल्या काही दिवसांत आमच्या पोस्ट आणि ट्विटला उत्तरांमध्ये पाठवत असलेले सर्व समर्थन संदेश आणि गोंडस gif आम्ही पाहतो आणि त्यांचे कौतुक करतो. तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत!
अद्यतन १६ जुलै, २०२२, ११:५५ UTC: आमंत्रण विनंती करण्याची क्षमता, तांत्रिक समर्थन आणि अभिप्राय फॉर्म, आणि धोरणात्मक प्रश्न आणि तक्रारनोंद, सर्व परत ऑनलाइन आहेत.
